दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना कोर्टाचा दिलासा

February 23, 2016 11:24 AM0 commentsViews:

dilip-kumar

मुंबई – 22 फेब्रुवारी : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना आज (मंगळवारी) चेक बाउन्स प्रकरणी मुंबई कोर्टानं दिलासा दिला आहे. यावेळी, दिलीप कुमार यांचा या प्रकरणाशी थेट सहभाग नव्हता, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.

1998 साली जे. के. एक्झिम ट्रेडिंग कंपनीमध्ये दिलीप कुमार संचालक होते. या कंपनीत डेक्कन सिमेंटस्‌नं 1 कोटींची गुंतवणूक केली. कंपनीला जेव्हा हे पैसे परत देण्याची वेळ आली, तेव्हा चेक बाऊन्स झाले, आणि डेक्कन सिमेंटस्‌नं दिलीप कुमार यांच्याविरोधात खटला दाखल केला. या प्रकरणाची आज गिरगाव इथल्या मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी झाली.

दरम्यान, तब्येत नाजूक असतानाही दिलीप कुमार कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी ट्विटरवर दिली. दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना सांगताना दु:ख होत आहे पण मंगळवारी दिलीपजी एका 18 वर्षे जुन्या कोर्ट प्रकरणाच्या सुनावणीसाठी गिरगावच्या कोर्टात हजर राहणार आहेत. यासोबतच आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी न केल्याबद्दलही सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांचं कौतुक केलं. तसंच दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन सायरा बानू यांनी केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close