…’त्या’ने वाचवलं दोन जीवांना!

February 23, 2016 2:46 PM0 commentsViews:

ãÖêË´Ö¯ÖÝÖߦüŸÖÝÖ21

गडचिरोली – 23 फेब्रुवारी :  देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरणारी घटना नुकतीच गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात घडली आहे. चिंतलपल्ली कालेश्वर घाटावर गोदावरी नदीत रविवारी झालेल्या एका दुर्घटनेत एक नाव बुडाली होती. त्यात वाहुन जाणार्‍या एका गर्भवती महिलेला एका तरुणाने नदीत उडी मारुन वाचवलं होतं. ही महिला सुखरुप वाचल्यानंतर तिचं बाळंतपण झालं तिने एका मुलाला जन्मही दिला.

सिरोंचा ग्राम पंचायतचे माजी सदस्य नरेश धर्मपुरी हे त्यांच्या नऊ महिन्याची गर्भवती पत्नी अलैक्याला बाळंतपणासाठी तेलंगणला घेऊन जाण्यासाठी निघाले होते. यावेळी नरेश यांच्या आई आणि सासू याही त्यांच्या सोबत होत्या. मात्र अचानक ही बोट बुडू लागल्यामुळे एकच हलकल्लोळ माजला. त्यावेळी नरेश यांनी त्यांच्या आई आणि सासूला वाचवलं मात्र पत्नी अलैक्या प्रवाहासोबत वाहू लागली. अशावेळी ही घटना पहाणारा मतीन शेख हा तरूण पाण्यात झेपावला आणि त्याने अलैक्या यांचा जीव वाचवला. मतीनच्या या धाडसामुळे आज आई आणि तीचं मुल असे दोन्ही जीव वाचले आहेत. त्यामुळे मतीनच्या या धाडसाचं सर्वांकडून कौतुक होतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा