सरकारच्या कमतरतांवरही संसदेत चर्चा व्हावी – नरेंद्र मोदी

February 23, 2016 2:26 PM0 commentsViews:

pm modi33
दिल्ली – 23 फेब्रुवारी : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीतपणे पार पडेल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केली. तसंच अधिवेशनादरम्यान सरकारच्या कमतरतांवरही चर्चा झाली पाहिजे, असं मतही मोदींनी व्यत्क केलं आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. तत्पूर्वी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष गंभीर आणि मजबूत असेल, तर लोकशाही सशक्त होते, असं सांगितलं.

संसदेच्या कामकाजाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेकडे देशाप्रमाणेच जगाचेही लक्ष आहे. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज सुरळीतपणे पार पडावं, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. विरोधकांशी संवाद सुरू आहे. संसदेमध्ये विविध विषयांवर गंभीरपणे सखोल चर्चा झाली पाहिजे, असं ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close