पुण्यात भरदिवसा तरुणावर कोयत्याने वार करून निर्घृण हत्या

February 23, 2016 4:29 PM0 commentsViews:

kolhapur crimeपुणे – 23 फेब्रुवारी : कोथरूड परिसरात भरदिवसा एक तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. एरंडवण्यातील पौड फाटा येथील पुला खाली सागर शिंदे (30) या तरुणाची डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले. या हल्यात तरुणाचा मृत्यू झालाय.

सकाळी 11 वाजता ही घटना घडली. सागर गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तीथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. हल्ला करून आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सागर शिंदेवर कोणत्या कारणामुळे हल्ला झाला हे अद्याप समजलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close