मुलानेच वृद्ध आईला ठेवलं साखळ दंडाने बांधून, पोलिसांनी केली आईची सुटका

February 23, 2016 5:14 PM0 commentsViews:

buldhana3बुलडाणा – 23 फेब्रुवारी : जिल्ह्यात एका मुलानंच आपल्या आईला साखळीने बांधून ठेवलंय. बंदी केलेल्या या मातेची सुटका करून निर्दयी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर मधली ही घटना आहे. हरिदास गनबास या निर्दयी मुलानं आपल्या 90 वर्षांच्या आईला साखळीने बांधून ठेवलं होतं. ही माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी त्या वृद्ध मातेची सुटका केली. हरिदास ने चक्क आपल्या आईला अंगनात उन्हा मध्ये पलंगावर साखळ दंडाने बांधून ठेवले होते ज्या आईने मुलाला जन्म दिला त्यानेच हा प्रकार केल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. ही बातमी पोलिसांना कळताच पोलिसांनी त्या वृद्ध आईची सुटका करत तिला उपचारार्थ मलकापूर रुग्णालयात दाखल केले आहे तर आरोपी ला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा रेल्वेमध्ये कार्यरत असल्याची माहिती देखील मिळाली आहे..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close