कोकणातला दाऊदचा बंगला ग्रामपंचायत घेणार ताब्यात

February 23, 2016 5:24 PM0 commentsViews:

रत्नागिरी – 23 फेब्रुवारी : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा कोकणात एक बंगला आहे, आणि हा बंगला ताब्यात घेण्याबाबत ग्रामपंचायतीने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या हा बंगला आयकर विभागाच्या ताब्यात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुमके गावात हा बंगला आहे. येत्या 26 तारखेला ग्रामसभा बोलावण्यात आली आहे, आणि या सभेत बंगला ताब्यात घेण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात येईल.dawod_bangla

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम चा कोकणातल्या मुंमके गावात असलेला बंगला आता मुंमके ग्राम पंचायतीच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली 20 , 22 वर्ष वीना वापर असलेला हा बंगला सध्या आयकर विभागाच्या ताब्यात आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मुमके ग्राम पंचायतीला पत्र पाठवून हा बंगला ताब्यात घेण्याविषयी कळविले आहे. त्यानुसार येत्या 26 फेब्रुवारीला गावाची ग्रामसभा बोलावण्यात आली असून हा बंगला ताब्यात घेण्याविषयीच्या प्रस्तावावर या ग्राम सभेत ठराव होणार आहे. 15 दिवसा पूर्वीच जिल्हा पोलिस प्रशासनाने या बंगल्याचा वापर काही समाजकंटकाकडून अवैध धंद्यासाठी होत असल्याच्या संशया वरुन या बंगल्याभोवती पोलिसांची गस्त वाढवलेली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close