माजी आमदार पाशा पटेल यांचं साहित्य आमदार निवासमधून बाहेर

February 23, 2016 7:17 PM0 commentsViews:

pasha+patelमुंबई – 23 फेब्रुवारी : भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांचं साहित्य आमदार निवासातून बाहेर काढण्यात आलं. पाशा पटेल हे भाजपचे माजी आमदार आहेत. मनोरा आमदार निवासमधील रूम बी-92 मधून पटेल यांचं साहित्य काढलंय.

रूम बी-92 ही महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावावर होती. पाशा पटेल यांचा कार्यकाळ 2012 मध्येच संपला. तरीही 3 वर्ष रूम त्यांच्याच ताब्यात होती.

पाशा पटेल यांना रूम खाली करण्याची वारंवार सूचना देऊनही रूम खाली न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. पाशा पटेल यांचं साहित्य सील करुन जमा करण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close