सूरज परमार आत्महत्येप्रकरणी चारही आरोपी नगरसेवकांची जामिनावर सुटका

February 23, 2016 8:15 PM0 commentsViews:

suraj_parmarठाणे – 23 फेब्रुवारी : बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी चारही आरोपी नगरसेवकांची जामिनावर सुटका झाली आहे. नगरसेवक सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि हणमंत जगदाळे यांना ठाणे न्यायालयानं जामीन दिला आहे.

मागील आठवड्यात या चार आरोपी नगरसेवकांपैकी नजीब मुल्ला यांची जामिनावर सुटका झाली होती. आज या तीन नगरसेवकांना जामीन मिळालाय. मात्र सरकारी पक्ष या जामिनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे.

सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या डायरीमध्ये या चारही नगरसेवकांचा उल्लेख केला होता. त्यावरून या चारही नगरसेवकांना अटक करण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close