डॉनचे प्रस्थ वाढत आहे…

March 11, 2010 10:09 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी मायानगरी मुंबईत पुन्हा एकदा भाईगिरी आणि डॉनच्या धमक्यासत्र वाढत चालले आहे. केवळ डॉनच्याच नाही तर शहरातील लहान-मोठे गुंड डॉनच्या नावाने धमक्या देऊन खंडणी वसूल करतात, अशा तक्रारी मुंबई पोलिसांकडे येत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन किंवा एखाद्या बड्या भाईच्या नावाने दुबईतून बरेचदा मुंबईत फोन कॉल्स केले जातात. पण त्यातील प्रत्येक कॉल हा केवळ दुबईतून आलेला नसतो. तर आपल्याच शहरातून परदेशी नंबरवरून काही जण हा धमकावण्याचा उद्योग करत असतात. असे फोन कॉल्स आले तर, लगेच पोलिसांना किंवा सायबर सेलला संपर्क करा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. पण अशा धमक्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे बिल्डर्स आणि बडे व्यापारी धास्तावलेत, हेही तितकेच खरे.

close