घरपोच पोषण आहाराच्या नव्या धोरणामुळे बचतगटांचा घास बड्या कंपन्यांना?

February 23, 2016 10:37 PM0 commentsViews:

 23 फेब्रुवारी : घरपोच पोषण आहार योजनेसाठी नव्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यातल्या नियम-अटी केवळ बड्या ठेकेदारांसाठीच बनवल्यात की काय अशी शंका उपस्थित होतेय.

bachat_gatघरपोच पोषण आहार म्हणजे टीएचआर योजनेचं काम महिला बचत गटांना मिळावं, यासाठी महिला बचतगट महासंघानं सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला. आणि ठेकेदार आणि आयसीडीएसच्या अधिकारांना घाम फोडला. दोन दिवसांपूर्वीच नाागपूर खंडपीठानं सरकारच्या निर्णयला स्थगिती दिली होती. पण आता या नव्या धोरणामुळे बचतगटांना काम मिळणारच नाही, असं दिसतंय. कारण धोरणातल्या कुठल्याच नियमात बचतगट बसणार नाहीत. यापुढे यासाठी महाराष्ट्रातले फक्त चार ठेकेदार पात्र ठरणार आहेत, ज्यांनी 2009पासून ठेका घेतलाय.

बचतगटांचा घास बड्या कंपन्यांना?

1. पुरवठ्याबाबत पाच वर्षांचा अनुभव
2. महागड्या एक्सक्ल्युडर मशीनची सक्ती
3. एक्साईज रजिस्ट्रेशन बंधनकारक
4. कॉर्पोरेट कंपन्यांसाठीचे सर्टिफिकेट्स आवश्यक
5. तालुक्याऐवजी जिल्हास्तरावर टेंडर काढणार
6. म्हणजे एक ठेकेदार अनेक जिल्ह्यांमध्ये काम करू शकणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close