प्रियकरासोबत फिरायचं म्हणून ‘ती’ने स्वत:च्याच घरावर घातला दरोडा

February 23, 2016 10:45 PM0 commentsViews:

पुणे – 23 फेब्रुवारी : हौसमौजेसाठी प्रियकराच्या मदतीनं तरुणीनं स्वत:च्याच घरात दरोडा टाकण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अजय कांबळे, अमोल जाधव, अनिल जाधव, परेश सोनार आणि एका मुलीसह पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.pune_daroda

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी मुलीचे वडील हे 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान कुटुंबासह कोकण दर्शनासाठी गेले होते. या काळात त्यांच्या घरात बनावट चावीचा वापर करून घरफोडी करून घरातले सोन्याचे दागिने चोरल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. घरफोडीत एकूण 11 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबईल चोरीला गेल्याचं आढळलं. दरम्यान, यापैकी अनिल जाधव आणि अनिल कांबळे यांनी पुण्यातील एका सराफाकडे दागिने मोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अजय कांबळे आणि संबंधित तरुणीमध्ये प्रेमसंबंध असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी तपास केला असता तरुणीनंच मित्रांच्या मगतीनं स्वत:च्या घरात दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांच्याकडून नऊ लाख रुपये आणि दुचाकी जप्त केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close