म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आज 4275 घरांची सोडत

February 24, 2016 10:16 AM0 commentsViews:

MHADA121

मुंबई – 24 फेब्रुवारी : आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाचे अर्ज भरलेल्या ग्राहकांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळाकडून बांधण्यात येणार्‍या घरांची सोडत आज (बुधवारी) जाहीर होणार आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न कोण साकार करतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आज सकाळी 10 वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात येईल.

वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 4,275 घरांसाठी ही सोडत पार पडणार आहे. कोकण विभाग विरार-बोळींज, ठाण्यातील कावेसर आणि बाळकुम तसेच वेंगुर्ला परिसरात 4 हजाराहून अधिक घरं बांधली जाणार आहेत. यामध्ये विरारमधल्या 3755 घरांचा तर घोडबंदर ठाणे-मीरारोड इथल्या 310 घरांचा समावेश असणार आहे. तसंच ठाण्यातील बाळकुमंबमधल्या 20, कावेसारमधल्या 164 घरं अल्प उत्त्पन्न गटातील असतील. त्यासोबत वेंगुर्लामध्ये 27 घरांचा समावेश असणार आहे.

या सोडतीसाठी म्हाडाने खास तयारी केली असून त्याची सारी सज्जता म्हाडाच्या मुख्यालयात करण्यात आलीय. मुंबईतील घरांसाठी लाखोंच्या घरात अर्ज करण्यात आले आहेत. यातल्या फक्त सव्वाचार हजार लोकांचंच घराचं स्वप्न आज साकार होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close