डान्सबारच्या जाचक अटींवरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

February 24, 2016 1:56 PM0 commentsViews:

sadasadpy

24 फेब्रुवारी : महाराष्ट्रातील डान्सबार संदर्भातील जाचक, अटींवरून सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारला चांगलंच फटकारलं असून, याप्रकरणी 1 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आलं आहेत.

सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी राज्य शासनाच्या डान्सबार बंदीच्या निणर्याला स्थगिती देत राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने डान्सबार सुरू करण्यासंदर्भात बार मालकांना जाचक अटी घातल्या. याविरोधात आक्षेप घेत बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज झालेल्या सुनावणीत जाचक अटींवरून सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला फटकारलं. या संदर्भात येत्या 1 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेशही कोर्टाने सरकारला दिले आहेत.

दरम्यान, डान्सबार बाबत अद्यापही राज्य सरकारकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले नाही. यावरून डान्सबार संदर्भात शासन किती गंभीर आहे, हे दिसून येते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close