लिफ्ट मेन्टेनन्सकडे दुर्लक्ष

March 11, 2010 10:31 AM0 commentsViews: 5

प्रीती खान, मुंबईपसरणार्‍या मुंबईसोबतच येथील उंच बिल्डिंग आणि लिफ्टची संख्याही वाढते आहे. पण लिफ्टचे बांधकाम आणि लिफ्ट मेन्टेनन्सवर नजर ठेवणारे शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते मात्र अपयशी ठरले आहे.लिफ्ट ऍक्ट कायद्याप्रमाणे प्रत्येक लिफ्ट इन्सपेक्टरने आपल्याला नेमून दिलेल्या विभागातील लिफ्टची सुरक्षा तपासणे बंधनकारक आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभागातले अधिकारी स्वत:हून लिफ्ट इन्सपेक्शनसाठी जातच नाहीत.मुंबई आणि उपनगरात एकूण 46 हजार लिफ्ट आहेत. तर महाराष्ट्रात एकूण 78 हजार 500 लिफ्टस् आहेत. या लिफ्ट चेक रण्यासाठी पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकल विभागाकडे फक्त 11 इंजीनिअर आहेत.मुंबईत उंच बिल्डिंगमध्ये लिफ्टशिवाय पर्याय नाही. आणि या लिफ्टच्या अपघातांची संख्याही वाढती आहे.पण याची सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्वा नाही.

close