आझमींचे इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याची माहिती

March 11, 2010 12:33 PM0 commentsViews: 6

11 फेब्रुवारीसमाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेशी कथित संबंध असल्याचे, दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दिल्लीतील बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींच्या जबाबातून ही बाब समोर आली आहे. आपल्याला नेपाळला पळून जाण्यासाठी आझमी यांनी 8 हजार रुपयांची मदत केली होती, अशी कबुली यातील एक अतिरेकी मोहम्मद शाहजाद याने दिली आहे. एन्काऊंटरनंतर आपण मुंबईत पळून गेलो होतो. तिथे आपण अबू आझमी यांना त्यांच्या कुलाबा येथील ऑफीसमध्ये भेटलो होतो. त्यांनी आपल्याला मुंबईतून पळून जाण्याचा सल्ला दिला. आणि नेपाळला जाण्यासाठी 8 हजार रुपयेही दिले, अशी कबुली यातील एक आरोपी मोहम्मद शाहजाद याने दिल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मात्र अजून दुजोरा दिलेला नाही.दरम्यान, इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्याच्या कबुलीजबाबात सत्यता असेल, तर सरकारने अबू आझमींवर कारवाई करावी. तसेच विधानसभेत अबू आझमींना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

close