गोसेखुर्द सिंचन घोटाळ्याप्रकरणी 2 अधिकार्‍यांसह 5 कंत्राटदारांवर गुन्हे दाखल

February 24, 2016 6:18 PM0 commentsViews:

gosikhurd43नागपूर – 24 फेब्रुवारी : 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने सुरू केलेल्या एसीबीच्या खुल्या चौकशीनंतर नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन अधिकार्‍यांसह पाच कंत्राटदारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या कामातील गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करणार्‍या दोन सिंचन घोटाळ्यातील अधिकारी आणि पाच कंत्राट घेणार्‍या कंपनीच्या संचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता सोपान सुर्यवंशी आणि निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश वर्धने अशी या अधिकार्‍यांची नावे आहेत. तर एफ ए कंस्ट्रक्शनचा संचालक फतेह मोहम्मद अब्दुल खत्री, निसार फतेह खत्री, जैतून फतेह मोहम्मद खत्री, आबिद फतेह खत्री आणि जाहिद फतेह खत्री अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close