महाराष्ट्र रजनी आग प्रकरणी ‘विझक्राफ्ट’वर ठपका ,अग्निशमन नियमांचा केला भंग

February 24, 2016 6:48 PM0 commentsViews:

मुंबई – 24 फेब्रुवारी : मेक इन इंडिया कार्यक्रमात अग्नितांडवामुळे राज्य सरकारची नाचक्की झाली. पण, याला कारणीभूत कार्यक्रमाची आयोजक विझक्राप्ट इव्हेंट कंपनी असल्याचं समोर आलंय. या प्रकरणाचा अहवाल सादर झालाय. यात विझक्राफ्ट कंपनीवर ठपका ठेवण्यात आलाय.firethumb

मेक इन इंडिया चा नारेबाजी करत मुंबईत मागील आठवडा चांगलाच गाजला. पण, या कार्यक्रमाला गालबोट लागले ते महाराष्ट्र रजनी कार्यक्रमामुळे. रविवारी गिरगाव चौपाटीवर ‘महाराष्ट्र रजनी’ हा कार्यक्रम सुरू होता. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, ड्रिमगर्ल हेमामालिनी यांच्या परफॉर्मन्सनंतर पूजा सावंतच्या लावणी सुरू असतांना भर स्टेजला आग लागली. बघता बघता या आगीने अवघा स्टेज गिळकृत करत भस्म केला. या अग्नितांडवामुळे राज्य सरकारची चांगलीच नाचक्की झाली.

या प्रकरणाचा अहवाल आता सादर झालाय. विझक्राफ्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर ठपका ठेवण्यात आलाय. प्रथमदर्शनी विझक्राफ्ट कंपनीची चूक समोर आलीये. या कंपनीने अग्निशमन नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. कार्यक्रमस्थळी एलपीजी सिंलेडरचा वापर केल्याचं तपासातून पुढे आलंय.

पण, या एलपीजी सिलेंडरच्या गॅसच्या आगीपासून गणेशमूर्ती साकारणार होते यासाठी हे सिलेंडर आणण्यात आले होते. स्टेजखालून 1 स्फोट झालेला सिंलेडर आणि 5 भरलेले सिंलेडर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, विझक्राफ्ट कंपनीने आधीच आम्ही अग्निशमन दलाचे सर्व नियम पाळले आहे असा दावा केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close