बजेटमधील घोषणा, वाचा एकाच पेजवर

February 25, 2016 3:12 PM0 commentsViews:
 • Feb 25, 2016

  14:24(IST)

  रेल्वे इतर प्रवासाच्या साधनांशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न - सुरेश प्रभू

 • 14:24(IST)

  रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करणार -सुरेश प्रभू

 • 14:22(IST)

  अपंगासाठी विशेष शौचालयांची सेवा - सुरेश प्रभू

 • 14:21(IST)

  बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार - सुरेश प्रभू

 • 14:21(IST)

  रेल्वेचा पहिला ऑटो हब चेन्नईमध्ये - सुरेश प्रभू

 • 14:21(IST)

  अहमदाबाद - मुंबई अतीजलद बुलेट ट्रेन जपान सरकारच्या मदतीने उभारणार - सुरेश प्रभू

 • 14:20(IST)

  रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरवण्याची सोय - सुरेश प्रभू

 • 14:20(IST)

  मुंबईत सगळे कमी उंचीचे प्लॅटफॉर्म या वित्तीय वर्षात त्यांची उंची वाढवणार - प्रभू

 • 14:17(IST)

  2000 रेल्वे स्टेशनवर माहितीसाठी स्क्रिन उभारल्या जाणार -सुरेश प्रभू

 • 14:15(IST)

  एटीव्हिएम मशीन डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करता यावासाठी अद्यायावत सेवा देणार - सुरेश प्रभू

 • 14:08(IST)

  या बजेटमधून कुणाचंच समाधान होणं शक्य नाही -राजू शेट्टी

 • 14:08(IST)

  या बजेटवर आम्ही असमाधानी, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ

 • 14:07(IST)

  हे बजेट शब्दांचा खेळ - अशोक चव्हाणांची टीका

 • 13:30(IST)

  चर्चगेट-विरार आणि सीएसटी -पनवेल असे मुंबईसाठी होणार दोन नवे उपनगरीय कॉरिडॉर

 • 13:30(IST)

  रतन टाटांचंही सहकार्य रेल्वेच्या विकासासाठी घेणार- सुरेश प्रभू

LOAD MORE

नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2016 -17 साठी रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसामन्यांना दिलासा देत कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही. सुरेश प्रभू यांनी सोईसुविधांवर भर देण्याचा प्रयत्न करत हायटेक असं बजेट सादर केलंय. या बजेटमधील सुरेश प्रभू यांनी कोणत्या घोषणा केल्यात वाचा खालील लाईव्ह ब्लॉगमध्ये….


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close