‘भाजपमध्ये मतभेद नाहीत’

March 11, 2010 1:59 PM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारीमहिला विधेयकावरून भाजपमध्ये अजिबात मतभेद नाहीत, असे विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. पण भाजपचा राज्यसभेत मार्शल आणण्यास विरोध होता. राज्यसभेत मार्शल्सच्या उपस्थितीत चर्चा आणि मतदान करणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतली होती. पण त्याचा गैरअर्थ काढत भाजपमध्ये महिला विधेयकावरून मतभेद असल्याचा गैरसमज पसरवला गेल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांनी ही माहिती दिली. आम्ही महिला विधेयकाच्या बाजूने आहोत. या विधेयकावर लोकसभेत पहिल्यांदा सविस्तर चर्चा व्हावी. आणि नंतरच त्यावर मतदान व्हावे, मार्शल्सच्या उपस्थितीत आम्ही ही चर्चा होऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी बजावले. याचवेळी या विषयावर प्रणव मुखर्जी सर्वपक्षीय बैठक बोलावणार आहेत. त्याचे आम्ही स्वागत करतो, असेही त्या म्हणाल्या. तर या विषयावरच चर्चा करण्यासाठी आमची मंगळवारी बैठक होत आहे. या बैठकीत होणारा निर्णय खासदारांना बंधनकारक असेल. विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी पक्ष व्हिप काढेल. त्याचे पालन प्रत्येक खासदाराला करावेच लागेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

close