सफाई कामगाराच्या शॉर्ट फिल्मचा गौरव

March 11, 2010 2:21 PM0 commentsViews: 12

गोविंद तुपे, मुंबईतुम्ही जे काम करता तीच तुमची एकमेव ओळख नसते, तर तुमचा एखादा छंद तुमची नवी ओळख घडवू शकते. बेस्टमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणारे सुरेश शेलार यांनी असा छंद जोपासला आहे.त्यांनी बनवलेल्या शॉर्ट फिल्मला नुकताच दिल्लीत झालेल्या इंटरनॅशनल यूथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऍवॉर्डही मिळाले आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले शेलार बेस्टमध्ये हेल्परचे काम करतात. त्यांनी बनवली आहे , 'बर्थ डे' ही समलैंगिक संबधांबद्दल भाष्य करणारी शॉर्ट फिल्म. ती बनविण्यासाठी त्यांना जवळपास 50 हजार रूपये खर्च आला. यूथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये या फिल्मला ऍवॉर्डही मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला आहे.भविष्यात एक चांगले दिग्दर्शक बनण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

close