कोल्हापुरात रंगला अश्वमेघ रिंगण सोहळा

March 11, 2010 2:30 PM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारीमाऊली माऊलीच्या गजरात आज कोल्हापूर जिल्ह्यातील म्हारूळ गावात अश्वमेघ रिंगण सोहळा पार पडला. आषाढ महिन्यात वारीच्या काळात ज्यांना विठोबाच्या दर्शनासाठी जाता येत नाही, अशा गावकर्‍यांना रिंगण सोहळ्याचा आनंद मिळावा या हेतूने इथे हा रिंगणसोहळा आयोजित केला जातो. गेल्या 75 वर्षांची ही परंपरा आहे. यासोबतच इथे पारायण, प्रवचन, भजन, कीर्तन अशा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावाबाहेरच्या मडक्याच्या मळ्यावर 5 एकर परिसरात रिंगण आखला जातो. त्यावर फुलांचा सडा टाकून रिंगण तयार केले जाते. त्यानंतर माऊली माऊलीच्या गजरात रिंगण सोहळ्याला सुरवात होते. सात फेर्‍यानंतर हा सोहळा पार पडतो.

close