पुण्यात हनुमान टेकडीवर विद्यार्थिनीवर बलात्कार

February 26, 2016 5:34 PM0 commentsViews:

vadala_rape_caseपुणे – 26 फेब्रुवारी : पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडीवर बलात्कार करून चोरी केल्याची घटना घडली आहे. सेनापती बापट रोड वरील प्रतिष्ठीत महाविद्यालयाची विद्यार्थिनी या अत्याचाराला बळी पडली आहे. 24 तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर 25 तारखेला उशिरा मुलीच्या तक्रारी वरून चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बलात्काराबरोबरच या युवतीकडील मोबाईल, एटीएम कार्ड आणि रोख रक्कम देखील चोरण्यात आली. पीडित विद्यार्थिनी ही परराज्यातील असून ती शिक्षणाकरिता पुण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच चतुश्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि या प्रकरणात काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष, म्हणजे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडलीय. मात्र तक्रार आज दाखल झालीये. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात 376 आणि 392 कलमांतर्गत जबरी चोरी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close