महाराष्ट्राच्या मातीत जपानी कबड्डी

March 11, 2010 2:43 PM0 commentsViews: 5

स्वाती घोसाळकर, मुंबईमहाराष्ट्राच्या मातीतील खेळ म्हणजे कबड्डी. हा खेळ आता भारताबाहेरही जोर धरू लागला आहे. सध्या जपानची पुरूष आणि महिला टीम भारत दौर्‍यावर आहे. यात 18 पुरूष आणि 13 महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रॅक्टिस मॅच खेळणार आहेत. मुंबईच्या नायगाव मैदानात मुंबई पोलिस महिला टीमशी जपान महिला कबड्डी संघाचा सामना रंगला.कबड्डीचा प्रसार जगभरात होण्यासाठी भारतीय कबड्डी संघटना प्रयत्नशील आहे. याचाच एक म्हणून जपानच्या पुरुष आणि महिला कबड्डी टीमला भारतात आमंत्रित करण्यात आले आहे. अटीतटीची झालेली ही मॅच जपानच्या टीमने एका गुणाने जिंकली. पण भारतीय दौर्‍यावर पहिल्यांदाच आलेल्या जपानच्या पुरूषांच्या टीमला मात्र विजय मिळवता आला नाही. पोलिस टीमने त्यांचा 27-23 असा पराभव केला. पण भारतीय दौर्‍यात संपूर्ण टीमची कामगिरी बघता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नमवून जपानच्या टीमने मेडल पटकावले तर आश्चर्य वाटायला नको.

close