आयपीएल सीझन थ्रीचा धमाका आजपासून

March 12, 2010 8:37 AM0 commentsViews: 6

12 मार्च आयपीएल सीझन तीनची धूम आज सुरू होत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर आज संध्याकाळी सहा वाजता आयपीएलचा भव्य उद्घाटन सोहळा रंगेल. बॉलीवूड स्टार्ससोबतच यात आंतरराष्ट्रीय कलाकारांची अदाही पहायला मिळणार आहे. सुरक्षेच्या कारणावरुन आयपीएलचा दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आला. आणि भारतीय क्रिकेटप्रेमींना आयपीएलची ही धूम अनुभवता आली नाही. पण भारतीय क्रिकेटपटूंनाही तितकीच उणीव जाणवली.पण आता पुन्हा एकदा आयपीएल भारतात होत आहे. साहजिकच क्रिकेटप्रेमींमध्येही जबरदस्त उत्सुकता आहे. आयोजनाचीही जोरदार तयारी झाली आहे.धडाकेबाज उद्घाटन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय कलाकारांची साथ लाभणार आहे. जोडीला लेजर शो आहेच. बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती हा तर क्रिकेटप्रेमींच्या आकर्षणाचा विषय आहे. आता पुढचे 44 दिवस क्रिकेटप्रेमींना क्रिकेटेमेंटची नॉनस्टॉप धमाल पहायला मिळणार आहे.

close