मालगाडीचे 4 डबे घसरल्याने नागपूर-मुंबई वाहतूक ठप्प

February 27, 2016 10:37 AM0 commentsViews:

Bhusawal accident

जळगाव : भुसावळ यार्डात मालगाडीचे 4 डबे रुळांवरून घसरून भुसावळ – नागपूर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नागपूरहून मुंबईला येणार्‍या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून त्या अनिश्चित काळासाठी विलंबाने धावत आहेत.

दरम्यान, अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे डबे रुळांवरून हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी वाहतूक पूर्वपदावर आणखी 3 ते 4 तास लागतील. दुपारी 12 पर्यंत वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close