2 महिन्यातून एकदाच धुतली जातात रेल्वेतील ब्लँकेट्स!

February 27, 2016 11:50 AM0 commentsViews:

Railway loacal12

नवी दिल्ली – 27 फेब्रुवारी : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांकडून वापरली जाणारी ब्लँकेट्स 2 महिन्यातून फक्त ‘एकदाच’ धुतली जातात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनीच याबाबत माहिती दिली असून यामुळे रेल्वेतील स्वच्छतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, रेल्वेतील ब्लँकेटची दोन महिन्यांतून एकदाच धुलाई होत असली तरी चादरी, बेडरोल रोज स्वच्छ केले जातात, अशी माहिती राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात देण्यात आली.

प्रवासादरम्यान रेल्वेकडून प्रवाशांना पुरवल्या जाणार्‍या वस्तूंचा दर्जा आणि स्वच्छतेबाबत संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिन्हा यांनी ही बाब उघड केली. राज्यमंत्र्यांच्या माहितीनुसार सध्या रेल्वेकडे फक्त 41 मशिन लाँड्री आहेत. तर जिथे मशिन लाँड्री नाहीत, तिथे बाहेरुन धुलाई प्रक्रिया केली जाते, अशी माहिती सिन्हांनी दिली. पुढील 2 वर्षांत हा आकडा 25 ने वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सुमारे 85 टक्के प्रवाशांना स्वच्छ ब्लँकेट्स मिळू शकतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती हामिद अन्सारी ‘पूर्वीप्रमाणे आताही प्रवाशांनी घरून स्वत:ची उशी, चादर आणण्यास सुरूवात केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असता ही सूचना चांगली असल्याचं सिन्हा यांनी नमूद केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close