ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

February 27, 2016 2:12 PM0 commentsViews:

Fadnavis 213

ठाणे- 27 फेब्रुवारी :  ठाण्यातील अनधिकृत, धोकादायक तसंच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबईप्रमाणेच क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे. ठाण्यासाठीच्या क्लस्टर योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आहे.

ठाण्यातील जुन्या आणि धोकादायक इमारतींसह अनधिकृत इमारतींतील रहिवाशांनाही याअंतर्गत घरं मिळणार आहेत. झोपडपट्‌ट्यांनाही या योजनेत सामावून घेतलं जाणार आहे. ही योजना मंजूर झाल्यानं 5 लाख ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. तसंच ठाण्याच्या नियोजनबद्ध पुनर्विकासासाठी हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. ठाण्यासाठी क्लस्टर विकासाचे धोरण मंजूर करण्यापूर्वी पर्यावरणदृष्ट्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. ठाण्याच्या क्लस्टर विकास धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी त्याची संपूर्ण माहिती हायकोर्टापुढे सादर करण्यात आहे.

या योजने अंतर्गत अधिकृत इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या सध्याच्या घराच्या क्षेत्रफळावर वाढीव 25 टक्के तर अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना 323 चौरस फुटाचं घर दिलं जाणार आहे. झोपडीधारकांना 269 चौरस फुटांचं घर मिळणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 10 वर्षांपासून या योजनेसाठी पाठपुरावा करत होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close