बिस्कीट कंपनीवर मंत्र्यांची धाड

March 12, 2010 9:11 AM0 commentsViews: 2

12 मार्चनागपूरच्या हिंगणा एमआयडीसी भागात असलेल्या सोबिस्को नावाच्या बिस्कीट कंपनीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी धाड टाकली. या कंपनीत बनवलेल्या बिस्कीटांचे वजन प्रमाणापेक्षा कमी असल्याची तक्रार होती. यावेळी बिस्कीटांची 20 हजार पाकीटे जप्त करण्यात आली. अनिल देशमुखांना याबद्दल काही दिवसांपूर्वी तक्रार मिळाली होती. देशमुखांना यावेळी 20 हजार 600 बिस्कीटांच्या पाकीटांचे वजन कमी असल्याचे आढळून आले. या कंपनीवर आता पॅकेजिंग ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.

close