राष्ट्रवादीची वाईत बैठक

March 12, 2010 9:20 AM0 commentsViews: 4

12 मार्चराष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता शिबीराला आजपासून सातार्‍यातील वाई इथे सुरवात झाली. आर.आर. पाटील यांनी या शिबीराचे उदघाटन केले. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पण या बालेकिल्ल्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादीला हार पत्करावी लागली होती. त्यामुळे हे शिबीर राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांकडून आगामी तीन वर्षात होणार्‍या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे. त्यासोबतच पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व राखण्यासाठी व्यूहरचना करण्यात येणार आहे. मात्र या शिबीरात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र भोसले उपस्थितीत नाहीत.

close