दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत राज्यातलं पहिलं शेतकर्‍यांसाठी वाचनालय

February 27, 2016 10:38 PM0 commentsViews:

osmanabad3उस्मानाबाद – 27 फेब्रुवारी : आज राज्यात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पण, दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. बाजार समितीत येणार्‍या शेतकरी, हमाल यांच्यासाठी राज्यातलं पहिलं शेतकरी वाचनालय सुरू करण्यात आलं आहे.

सध्या दुष्काळाचे दिवस आहेत. शेतात फारशी कामं नाहीयेत. शेतकर्‍याला दुष्काळ, बदलती पिकं पद्धती, रोजच्या घडामोडी माहिती होण्यासाठी विना मुल्य शेतकरी वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयात दुष्काळावरील तसंच पिक पद्धती वर्तमानपत्रे आणि इतर विषयाची पुस्तके वाचण्यासाठी ठेवली आहेत. दरम्यान, वाचना तून ज्ञान प्राप्ती होते आणि शेतकरी हे पुस्तकं वाचून त्याचा फायदा शेतीसाठी करतील असा विश्वास बाजार समितीचे सभापतींनी व्यक्त केलाय.  सध्या दुष्काळ असल्यामुळे शेतात. ही कामे नाही रिकामा वेळ खूप होता आता हे वाचनालय सुरु झाल्याने आमचा वेळ येते पुस्तक वाचण्यात जात असल्याचे शेतकरी व हमाल सांगत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close