आयपीएलवर बहिष्कार

March 12, 2010 9:32 AM0 commentsViews: 1

12 मार्चआयपीएल 3 ला आजपासून सुरूवात होत आहे. पण त्याअगोदरच वादांना सुरूवात झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयपीएलवर बहिष्कार टाकला आहे. महत्वाचे म्हणजे शरद पवारांनीही या बहिष्काराला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्यासह, मुंबई असोसिएशनचा कुठलाही पदाधिकारी आयपीएलच्या मॅचेसला उपस्थित रहाणार नाही. नेरुळच्या डी वाय पाटील आणि मुंबईतील ब्रेबर्न स्टेडियमवर आयपीएलच्या मॅचेस होत आहेत. पण अजूनही मुंबई क्रिकेट असोसिएशनला तिकीट मिळालेली नाहीत. त्यामुळेच हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

close