वसईत लग्नाचं वर्‍हाड घेऊन जाणारी बोट बुडाली, एकाचा मृत्यू

February 28, 2016 3:18 PM0 commentsViews:

vasi_ferryवसई – 28 फेब्रुवारी : नायगावहून पाणजू बेटावर जात असतांना वर्‍हाडाची बोट उलटली. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 11 जण जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

वसईहुन पाणजू बेटावर जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. वसईतील एक वर्‍हाड नायगावहून पाणजू बेटावर जात असतांना दुपारी 12.30 च्या सुमारास बोट उलटली. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. साधारणत:हा 30 ते 35 जणांची बोटीची क्षमता असते. पण क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या बोटीत चढल होते. सुदैवाने ही घटना किनार्‍यालगत झाली. त्यामुळे मोठी दुर्घटना ठळली. जखमींना क्रार्डिनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.मात्र, उपचारादरम्यान, रामचंद्र बाबाजी म्हात्रे यांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close