फेसबुकवर आता तुम्ही रागवू आणि दु:खही व्यक्त करू शकता !

February 28, 2016 4:55 PM0 commentsViews:

facbook reaction emoji28 फेब्रुवारी : फेसबुकवर एखादी पोस्ट आवडली तर आपल्याला फक्त लाईक या बटणाचा वापर करता येत होता. पण, जर ती पोस्ट आवडली तर आपण इमोजीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हतो. पण, आता फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्ग याने फेसबुक अपडेट केलंय आता आपण फक्त लाईकच नाही तर त्या लाईक सोबत इमोजी सुद्धा पाठवु शकतो.

फेसबुकवर आपल्याला एखादी पोस्ट आवडते,राग येतो,हसु येतं,किंवा दु:ख होतं. पण, आपण फक्त लाईक देऊ शकत होतो.आता आपल्याला पोस्ट प्रमाणे स्वत:च्या भावना व्यक्त करता येणार आहेत. लाईक हे बटण थोडा वेळ दाबून ठेवल्यावर हे इमोजी आपल्याला दिसणार आहे.फेसबुकचे युजर्स हे बर्‍याचं दिवसांपासून ‘डिसलाईक’ या बटणाची मागणी करताहेत. पण, मार्क झुकरबर्गने हे नवीन फिचर देऊन युजर्सना सुविधा दिली आहे.

दररोज आपल्याला दिसणार्‍या फेसबुक पोस्टपैकी काही दु:खद असतात तर काही दिलखुलास हसवणार्‍या असतात पण दु:खद पोस्टसाठी ‘लाईक’ हा पर्याय चुकीचा आहे असं झुकरबर्गचं म्हणणं आहे. म्हणूनच त्याने हे इमोजी दिले आहेत. ह्या मध्ये ‘हाहा,वॉव,लव,राग आणि दु:ख अशा पाच इमोजींचा समावेश आहे. युजर्सच्या म्हणण्यानुसार त्यांना ही नवीन सुविधा पसंत येत आहे आणि अजुनही विविध बदलांची अपेक्षा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close