मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

March 12, 2010 10:20 AM0 commentsViews: 4

12 मार्च औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांमध्ये आपापसातच हाणामारी झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हॉटेल रिवेरामध्ये मुलाखती सुरू असताना हा प्रकार झाला. यावेळी हॉटेलचीही तोडफोड करण्यात आली. एका गटाला औरंगाबादचे संपर्कनेते अतुल सरपोतदार यांना भेटायचे होते. पण औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर कार्यकत्यांना भेटू देत नव्हते. त्यामुळे राग अनावर होऊन ही हाणामारी झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या काचाही फोडल्या. या प्रकारामुळे औरंगाबादमधील मनसेमधील गटातटाचे राजकारण समोर आले आहे.

close