आज माझीही परीक्षा -पंतप्रधान मोदी

February 29, 2016 8:41 AM0 commentsViews:

modi man ki baatनवी दिल्ली – 29 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी बोर्डाच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच आज सादर होणार्‍या अर्थसंकल्पाच्या रूपात माझीही परीक्षा आहे असंही मोदी म्हणाले.

मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या बजेटमध्ये मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मोदी यांनी माझी बजेटरुपाने परीक्षा आहे असं सांगून दरवाढीचे संकेतच दिले आहे. सेवा कर 14 टक्क्यांवरून 16 टक्के करण्याची सुतोवात आधीच करण्यात आलाय. मोदी यांनी केलेल्या अनेक घोषणाची छाप या बजेटवर दिसून येतील. वाढती महागाई नियंत्रण आण्यासाठी अरुण जेटली काय भूमिका मांडता याकडे सर्व देशाचं लक्ष्य लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close