नोकरदारांवरचा कराचा बोजा हलका होणार की वाढणार ?

February 29, 2016 9:33 AM0 commentsViews:

Union Budget 2016 (4)

नवी दिल्ली – 29 फेब्रुवारी : अर्थमंत्री अरुण जेटली आज चालू वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पाकडून नोकरदार वर्गाच्याही मोठ्या अपेक्षा आहेत. किमान करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची मागणी होते आहे. तसंच गृहकर्जावरच्या व्याजदराची मर्यादा कमी करण्यात यावी असा सूर चाकरमान्यांकडून निघतो आहे. सध्या ज्या नोकरदारांचं उत्पन्न 2 लाख 50 हजार आहे त्यांना करातून सवलत देण्यात आलीये. अडीच लाखांच्या वर 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍यांना 10 टक्के कर आहे. तर 5 ते 10 लाखांसाठी 20 टक्के आणि 10 लाखांच्या पुढे उत्पन्न असणार्‍यांसाठी 30 टक्के कर आहे. आजच्या या बजेटमध्ये करमर्यादा वाढण्याची शक्यता आहे.

सध्याची आयकर मर्यादा काय आहे ?
———————————————————————-

उत्पन्न                                                        कर
———————————————————————-
-+ 2 लाख 50 हजारांपर्यंत                            करमुक्त

- 2 लाख 50 हजार ते 5 लाख                          10%

- 5 लाख ते 10 लाख                                        20%

- 10 लाखांच्या पुढे                                           30%

———————————————————————-

अर्थसंकल्प – 2016

सबसिडीचा फायदा कुणाला?

- सध्या अन्नधान्न, खते, इंधनावर सबसिडी
- सबसिडीचा फायदा श्रीमंतांनाच, आर्थिक सर्वेक्षणात चिंता
- अन्नधान्याच्या सबसिडीत 12.5 टक्के वाढीची मागणी
- रेशनकार्डाचं डिजिटलायझेशन करणार का?
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close