‘नावापेक्षा कामाकडे बघा’

March 12, 2010 12:26 PM0 commentsViews:

12 मार्च बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे नाव बदलून मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटी ठेवावे यासाठी शिवसेनेने काल केलेल्या आंदोलनाचा आज सोसायटीने निषेध केला. यासाठी सोसायटीच्या काही सभासदांनी निषेध आंदोलन केले. 126 वर्ष जुन्या असलेल्या आणि संशोधनात आघाडीवर असलेल्या या संस्थेच्या नावाकडे न बघता कामाकडे बघा असा संदेश या निषेध आंदोलनातून देण्यात आला. गुरूवारी शिवसेनेने अनिल देसाई आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. तसेच संस्थेच्या आवारात घुसून घोषणाबाजी केली होती. त्याबरोबरच संस्थेच्या नामफलकावर असलेल्या बॉम्बे या शब्दाऐवजी मुंबई हा शब्द असलेली अक्षरे चिकटवली होती. हे नाव लवकरात लवकर बदला, अशी संस्थेलाही ताकीद दिली होती.याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे संस्थेचे मार्केटींग हेड दिवेश पारिख यांनी सांगितले.

close