करदात्यांचे ‘अच्छे दिन’, इन्कम टॅक्स जैसे थे !

February 29, 2016 3:48 PM0 commentsViews:

tax_slab4नवी दिल्ली – 29 फेब्रुवारी : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोकरदारांना दिलासा दिलाय. बजेटमध्ये इन्कम टॅक्समध्ये कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे आहे. प्राप्तिकर कलम 87 ए नुसार पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना करामध्ये 3000 हजारांची सवलत देण्यात आलीये. त्याचबरोबर करमुक्त घरभाड्याची मर्यादा 24 हजारांवरून 60 हजार रुपये करआकारणी करण्यात आली आहे.

अशी राहिल आयकर मर्यादा
—————————————————————————–
उत्पन्न                                               कर
—————————————————————————–
-+ 2 लाख 50 हजारांपर्यंत                   करमुक्त

- 2 लाख 50 हजार ते 5 लाख              10% (3 हजारांची सूट)

- 5 लाख ते 10 लाख                           20 टक्के

- 10 लाखांच्या पुढे                              30 टक्के

—————————————————————————–

कराबद्दलच्या घोषणा
- छोट्या करदात्यांना दिलासा, 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणार्‍यांना करात 3 हजारांची सूट.
 आयकराच्या स्लॅबमध्ये बदल नाही
 करमुक्त घरभाड्याची मर्यादा 24 हजारांवरून 60 हजार रु.करआकारणी अधिक सुलभ करणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close