एसटी प्रवास महागला

March 12, 2010 12:45 PM0 commentsViews: 2

12 मार्च सर्व सामान्यांची एसटी आजपासून महाग झाली आहे. आज मध्यरात्रीपासून एसटी भाडेवाढ करणार आहे. किलोमीटरमागे 30 पैशांनी भाडे वाढवण्यात आले आहे. या वाढीचा फटका आता एसटीच्या 65 लाख प्रवाशांना बसणार आहे. तर या भाडेवाढीमुळे एसटीच्या तिजोरीत 400 कोटींची भर पडणार आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.काही महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवासभाडे पुढील प्रमाणे- वातानुकूलित (शिवनेरी) जुने भाडे नवे भाडे दादर – पुणे (रेल्वे स्टेशन) 225 250ठाणे – स्वारगेट (पुणे) 225250बोरिवली – स्वारगेट (पुणे) 265 300पुणे – नाशिक 305 345पुणे – औरंगाबाद 340 380मुंबई – औरंगाबाद 540 600

close