अखेर ‘टायटॅनिक’फेम लिओनार्डोला मिळाला ऑस्कर

February 29, 2016 4:24 PM0 commentsViews:

actor-leonardo-dicaprio-accepts-the-best-actor-award-for-the-revenant-photo-afpgettykevin-winter-1854424-leo-dicaprio-oscars-500x281

लॉस एंजलिस – 29 फेब्रुवारी : आपल्या 20 वर्षांच्या फिल्मीकरियरमध्ये तब्बल सहावेळा नामांकन मिळूनही ‘ऑस्कर’च्या बाहुलीला मुकलेला ‘टायटॅनिक’फेम अभिनेता लिओनार्दो दिकॅप्रिओ याला ‘द रेव्हनंट’ या सिनेमासाठी अखेर ‘ऑस्कर’ मिळाला आहे.

जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा सिनेक्षेत्रातील ’88वाऑस्कर पुरस्कार’ सोहळा अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये आज (सोमवारी) मोठ्या दणक्यात पार पडला. या सोहळ्यात द रेव्हनंट, स्पॉटलाईट आणि मॅड मॅक्स फ्युरी रोड या चित्रपटांनी बाजी मारली. स्पॉटलाईट चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला असून याच चित्रपटासाठी जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा मान मिळाला. तर तब्बल सहावेळा ऑस्करने हुलकावणी दिल्यानंतर अखेर लिओनार्दो दिकॅप्रिओला ‘द रिव्हनंट’ या सिनेमासाठी ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा लिओनार्दोला नामांकन मिळाले होते. ब्रायन क्रॅन्स्टॉन, मॅट डेमन, मायकल फासबेंडर, एडी रेडमाइन अशा दिग्गज अभिनेत्यांशी त्याची स्पर्धा होती. त्यामुळं प्रचंड चुरस होती. मात्र, या सगळ्यांना मागे टाकत लिओनार्दोनं बाजी मारली. या सन्मानामुळं त्याची 20 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तर अभिनेत्री ब्री लार्सनला ‘रुम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

विशेष म्हणजे, बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ ते हॉलीवूडची ‘क्वांटीको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. प्रियांकाच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संकलनाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close