मुंबईतील 93च्या स्फोटांना आज 17 वर्षे पूर्ण

March 12, 2010 1:18 PM0 commentsViews: 4

12 मार्चमुंबईत 12 मार्च 1993 ला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. शहरात 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांनी सगळा देश हादरला होता. दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 257 ठार तर 800हून अधिक लोक जखमी झाले होते. एअर इंडिया बिल्डिंग, शेअर बाजार, काथ्या बाजार, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, शिवसेना भवनाजवळ, सेंच्युरी बाजार या ठिकाणी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले होते. तर हॉटेल सेंटॉर, हॉटेल सी रॉक आणि एअरपोर्ट या ठिकाणी बॉम्ब पेरण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी हँण्डग्रेनेडने हल्ला करण्यात आला होता. या बॉम्बस्फोटाचा खटला सुमारे 15 वर्षे चालला. एकूण 123 आरोपींविरोधात हा खटला चालला. यापैकी 100 जणांना वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली. यापैकी 12 जणांना फाशीची शिक्षा झाली. तर इतरांना कमीत कमी 3 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षा झाल्या. याप्रकरणी अभिनेता संजय दत्तही दोषी ठरला आहे. सध्या तो जामिनावर मुक्त आहे.

close