100 वडापावांसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला मारहाण

February 29, 2016 6:23 PM0 commentsViews:

29 फेब्रुवारी : एकीकडे शिवसैनिकांची चांगली कामं माध्यमांना दिसत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंकडून होत असतांना शिवसैनिकांच्या दादागिरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या विलेपार्ले पश्चिम इथल्या युवासेनेचा पदाधिकार्‍याने तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजर चेतन पटेल यांना केली आहे. सुनील महाडीक असे या पदाधिकार्‍याचं नाव आहे. गेल्या शनिवारी 26 फेब्रुवारीला हा प्रकार घडला.

ÖêêËáÖ¸üÖê

विलेपार्ले पश्चिमच्या मैदानात बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं ‘साहेब क्रिकेट चषकाचे’ सामने भरवण्यात आलं होतं. या सामन्यांसाठी तृप्ती फरसाण मार्टच्या मालकानं 100 वडापाव फुकट दिले नाही, म्हणून सुनिल महाडीकने मॅनेजरला मारहाण केली आहे. तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजर यांना कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून सुनील महाडीकवर जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून गुन्ह्याची नोंद करत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

माध्यमांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर युवासेना पदाधिकारी सुनील महाडिकची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, मारहाण करणार शिवसैनिक दिसतो. मात्र तुम्हा मीडियाला रमेश वळुज दिसला नाही ज्याने 3 मुलींचे जीव वाचवले, या गोष्टीचा मला संताप येतो अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close