चिटफंड घोटाळे रोखण्यासाठी संपूर्ण देशात कठोर कायदा आणणार – जेटली

February 29, 2016 7:19 PM0 commentsViews:

arun jaithley213

नवी दिल्ली – 29 फेब्रुवारी :  गेल्या काही वर्षात देशामध्ये चिटफंड कंपन्यांनी छोट्या गुंतणूकदारांची फसवणूक केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात उजेडात आल्यात. या चिटफंड कंपन्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कायद्यात कठोर बदल करण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटमध्ये केली आहे.

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आपल्या बजेटमध्ये प्रथमच चिटफंड कंपन्यांच्या वाढत्या फसवणूकीला आळा घालण्यासाठी नवीन कायदा आणणार असल्याच जाहीर केल आहे. पश्चिम बंगालमध्ये 7 वर्षापूर्वी शारदा चिट फंड घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर देशात एका पाठोपाठ एक चिट फंड घोटाळ्यांची मालिकाच सुरू झाली. गेल्या 7 ते 8 वर्षांत सामान्यांचे कोट्यवधी लंपास करणार्‍या चिटफंड कंपन्यांच्या घोटाळ्यांवर एक नजर टाकूयात…

चिट फंड कंपन्यांचे घोटाळे : गुंतवणूकदारांची कोट्यवधींची लूट

  • पश्चिम बंगालमध्ये शारदा चिट फंड – 4 हजार कोटींचा घोटाळा
  • दिल्लीतल्या पर्ल्स चिटफंड कंपनीने – 10 हजार कोटीपेक्षा मोठा घोटाळा
  • महाराष्ट्रत के बी सी, मैत्रैय, साई प्रसाद चिट फंड – 2 हजार कोटींचा घोटाळा

चिट फंडमध्ये फसवले जाणारे गुंतवणूकदार हे प्रामुख्याने मध्यम आणि गरीब कुटुबांतील आहेत. आयुष्याभराच्या कमाईची धुळधाण झाल्याचं पाहुन अनेकांनी आत्महत्य केल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घटल्या आहेत. अर्थमंत्र्याच्या घोषणेन चिट फंडमध्ये पैसे अडकलेल्या देशातील लाखो गुंतवणुकदारांना दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.

एकुणच चिट फंड घोटाळे रोखण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित असला तरी यामधील तरतूदी अजून स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यामुळे या चिटफंड कंपन्यांना खरंच आळा बसेल का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close