ठाणे हत्याकांडाचं गूढ अजूनही कायम

March 1, 2016 9:44 AM0 commentsViews:

thane_muder_Caseठाणे – 01 मार्च : ठाण्याच्या कासारवडवलीमध्ये झालेल्या भीषण हत्याकांडामागचं गूढ अजूनही अस्पष्टच आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि जेवणाच्या नमुन्यांचे रिपोर्टस आल्यावरच यावर काही बोलता येऊ शकेल असं पोलिसांनी सांगितलं. महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धेतून हे हत्याकांड घडलंय का याही अंगानं तपास सुरू आहे. हसनैन धार्मिकवृत्तीचा होता मात्र कुठल्या बाबाकडे जायचा,कुठला विधी करायचा यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ज्या पद्धतीनं इतक्या निर्घृणपणे या हत्या करण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करता अंधश्रद्धेनं हा तरुण गुरफटलेला असल्याची शक्यता आहे. हुसनैनच्या कामात काही ना काही कारणास्तव अडथळे येत होते. त्याचं कामही सुटलं होतं त्यामुळे तो नैराश्येच्या गर्तेतही तो गेला होता. त्यातून बाहेर येण्यासाठी त्यानं काही अंधश्रद्धेचा मार्ग स्विकारलाय याही अंगानं तपास होतोय.

दोन वर्षांपूर्वी या सर्व कुटुंबाला विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशी माहिती स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा यांनी दिलीय.

तर या विषबाधेमागे कारण होतं ते अंधश्रद्धेचं..आपले आई, वडील, पत्नी, बहिणी आणि भाचे-भाची यांची कुणाचीच पर्वा त्यानं केली नाही. इतकचं काय त्याला स्वतःच्या अडीच महिन्यांच्या मुलीचीही दया आली नाही. त्यावरुन हे हत्याकांड घडलंच कसं ? हुसनैननं केलेल्या हत्यामागं त्याचा उद्देश्य तरी काय होता ? जर ही अंधश्रद्धा होती मग त्यानं आत्महत्या का केली ? अशा सगळ्या बाजून पोलीस तपास करतायेत. त्यामुळे ही अंधश्रद्धा की विकृती हे तपासअंतीच कळेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close