शेअर बाजार सावरला

March 1, 2016 12:07 PM0 commentsViews:

sensex1मुंबई – 01 मार्च : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारावर त्याचे पडसाद उमटले होते. आजही  शेअर बाजार पुन्हा वधारला.

सकाळी बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 500 अंकांनी वाढलाय. त्यामुळे शेअर मार्केट 23 हजार 500 वर जाऊन स्थिरावलंय. निफ्टीमध्येही 150 अंकांनी वाढ झाली.

दरम्यान, काल लोकसभेत बजेटचं वाचन सुरू होताच…600 अंकाची घसरण झाली होती. त्यामुळे मार्केटने जेटलींच्या बजेट नकारात्मक रिऍक्शन दिल्याची चर्चा होती.

पण, आज मार्केट पुन्हा सावरल्याचं बघायला मिळतंय. गेल्या पंधरा दिवसातली ही 500 अंकांची उच्चांकी वाढ सांगितली जातेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close