अखेर द ग्रेट खलीने घेतला बदला, ‘त्या’ तिघांनाही धोबीपछाड

March 1, 2016 12:56 PM0 commentsViews:

 ‘द ग्रेट खली’ जखमी झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना एकच धक्का बसला होता. पण, उपचारानंतर बरं होऊन त्याने ‘खून का बदला खून’ असा आक्रमक पवित्रा घेतला होता आणि त्याने तो पूर्ण करून दाखवला. खलीने तीन खेळाडूंना चितपट केलं. कॅनडाचा ब्रॉडी स्टिल, मॅक्स आणि अपोलोचा पराभव करून त्यांना स्पर्धेबाहेर केलं. ‘द ग्रेट खली रिटर्न्स मेगा शो’ हे टायटल त्यांनं आपल्या नावावर केलं असून तो ग्रेट खली आहे हे त्यानं सिद्ध करून दाखवलं. या आधीच्या सामन्यात ब्रॉडी स्टिल, मॅक्स आणि अपोलो या तिघांनी खलीवर हल्ला चढवला होता. खुर्चीने मारहाण झाल्यानं खली गंभीर जखमी झाला होता. तिघांनी मिळुन एकट्या खलीला मारहाण केली होती. खलीच्या डोक्याला मार लागला होता आणि त्याचा मानेला देखील दुखापत झाली. पण, रुग्णालयातून बाहेर येताच खलीनं आपला बदला पूर्ण करत विजय मिळवला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close