डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आज पहिली मॅच

March 12, 2010 1:45 PM0 commentsViews: 2

12 मार्चआयपीएलमध्ये आज पहिली मॅच रंगणार आहे ती गतविजेत्या डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान. आयपीएलच्या पहिल्या हंगामात सर्वात तळाला राहिलेल्या डेक्कन चार्जर्सच्या टीमने दुसर्‍या वर्षी मात्र स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अथक परिश्रम, टीम स्पिरीट आणि खेळाडूंचा स्वत:वरचा विश्वास हे या टीमच्या यशाचे खरे कारण आहे. आयपीएल स्पर्धेच्या फायनलनंतर सगळ्याच पेपरची हेडलाईन होती, 2008ची सर्वात अपयशी टीम यावर्षीची चॅम्पियन टीम…पण डेक्कनसाठी हा सगळा प्रवास सोपा नव्हता… गेल्या वर्षी आयपीएलमध्ये एक सर्वात्तम टीम निवडण्याचा टीम मालकांचा प्रयत्न होता. पण त्यांचा तो प्रयत्न फसला. पण त्यांनी फक्त युनिफॉर्मचा रंगच बदलला नाही, तर त्यांचा स्पर्धेमधला दृष्टीकोनही आक्रमक बनवला. यावेळी त्यांचा कॅप्टन गिलख्रिस्ट आणि कोच यांच्या देखरेखीखाली त्यांच्या सगळ्या योजना यशस्वी झाल्या.इतर काही टीमप्रमाणेच डेक्कननेही दक्षिण आफ्रिकेत खेळण्याचे आव्हान एन्जॉय केले. त्यातच आर पी सिंगचा परतलेला फॉर्म त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्ट ठरली. आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत गेल्या. कधी कधी त्यांच्या योजना चुकल्याही. पण तरीही त्यांच्या कामगिरीत काही फरक पडला नाही.हा विजय फक्त नशिबाचा भाग नव्हता, तर एक योजनेअंतर्गत मिळवलेला विजय असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान डेक्कनपुढे असणार आहे.

close