कधी होणार जाती आयोगाची स्थापना?

March 1, 2016 4:08 PM0 commentsViews:


रणधीर कांबळे, मुंबई

 01 मार्च :  आरक्षणाच्या मुद्यावर अनेक जातींनी आंदोलनाची भूमिका महाराष्ट्रात घेतलीय. मराठा, धनगर आणि इतर जातींच्या आरक्षणाचा मुद्द्याने महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. मात्र कुठल्या जातींना इतर मागासवर्गीयांच्या यादीत टाकावं किंवा वगळावं याचा अभ्यास करणार्‍या इतर मागासवर्गीय आयोगच अस्तित्वात नाही. त्यामुळं या विषयावर सरकार खरंच गंभीर आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. हीच अवस्था इतरही आयोगांच्या बाबतीत आहे.

Raklshanमराठा असो किंवा धनगर वा अन्य जाती, ज्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्यात, त्यांचा आरक्षण मिळवण्याचा कायदेशीर मार्ग मात्र थंडावला आहे. कारण कुठल्या जातींना आरक्षण द्यावं, कुणाला यादीतून वगळावं याचा अभ्यास करून अहवाल देणारा इतर मागासवर्ग आयोगच सध्या अस्तित्वात नाही.

या आयोगाकडे 70 ते 75 जातींना इतर मागासवर्ग प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठीचे अर्ज प्रलंबित आहेत. त्याशिवाय सोनार मारवाडी आणि घांची या दोन जातींना इतर मागासवर्गात समाविष्ट करण्याची शिफारस आयोगानं सरकारला केली आहे. मात्र मंत्रिमंडळाची उपसमिती याबाबत न तयार झाल्यानं हा विषय तसाच पडून राहिला आहे.

पारंपारिक व्यवसायातून भटक्या विमुक्तांनी बाहेर पडावं, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळंच भटक्या विमुक्तांना क्रिमी लेअर मधून वगळावं, असंही आयोगानं सरकारला शिफारस केली आहे. तसंच भावसार, रंगरेज, शिंपी या जातींना एकाच क्रमांकावर आणावं, अशी शिफारस आयोगानं केली आहे. त्यावरही निर्णय घ्यायला सरकारला वेळ नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close