मिरारोडमध्ये मनसे कार्यकर्त्यांची बिल्डरच्या कार्यालयात तोडफोड

March 1, 2016 5:37 PM0 commentsViews:

मुंबई  -01 मार्च :  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीनंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी समोर आली आहे. मिरारोडच्या नया नगर परिसरातील राज रिऍलिटी बिल्डरच्या ऑफिसची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. त्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

êÖêËÖêêËÖêpy
अनधिकृत वाचनालयावरील मनसेचा झेंडा आणि बोर्ड उतरवण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी 5 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र बिल्डरने 2 दिवसापूर्वीं वाचनालयाचा बोर्ड आणि झेंडा उतरवून कचरापेटीत टाकल्यामुळे मनसे संतप्त कार्यकर्त्यांनी बिल्डरच्या ऑफिसची तोडफोड केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close