बहुचर्चित ‘फॅन’चा दुसरा ट्रेलर लॉच

March 1, 2016 7:47 PM0 commentsViews:

01 मार्च :  शाहरुख खानचा डबल रोल असलेला ‘फॅन’ सिनेमाचा दुसरा ट्रेलर नुकतंच रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये शाहरुखच्या अभिनयाची वेगळीच छटा पहायला मिळते. शाहरूखने या चित्रपटासाठी आणि त्याच्या डबल रोलसाठी बरीच मेहनत केल्याचंही दिसुन येतंय.

‘फॅन’चा ट्रेलर पाहिल्यावर शाहरूखच्या ‘डर’ सिनेमाची आठवण नक्कीच येते. शाहरूखने या सिनेमातुन आपल्या फॅन्ससाठी सस्पेन्स ठेवला आहे.प्रेक्षकांसाठी हा सिनेमा ऍक्शन, ड्रामा, कॉमेडी, थ्रिलर आणि सस्पेन्स या सगळ्याचं पॅकेजचं ठरणार आहे.

‘फॅन’ सिनेमा येत्या 15 एप्रिल रोजी यशराज बॅनर खाली रिलीज होतोय, आणि त्यात शाहरुख विरुद्ध शाहरुख अशी स्पर्धा रंगणार हे तर निश्चितच. शाहरूखचे फॅन्स आता त्याच्या ह्या ‘फॅन’ला किती पसंती देतात हे 15 एप्रिलाच कळेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close